
India Richest Women Roshni Nadar : एका रात्रीत एक भारतीय तरुणी आशियतील सर्वात श्रीमंत महिला बनली आहे. ही तरुणी एका रात्रीत 3130313467080 एवढ्या संपत्तीची मालकिण झाली आहे. भारतातील या अति श्रीमंत तरुणीचे नाव आहे रोशनी नादर. एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांची ती मुलगी आहे. वडिलांमुळेच रोशनी नादर एका रात्रीत श्रीमंत झाली. असं केलं तरी काय तिच्या वडिलांनी जाणून घेऊया.
2019 मध्ये फोर्ब्सच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी नादर स्थान मिळाले आहे. फोर्ब्सच्या श्रीमंत महिलांच्या यादीत त्या 54 व्या क्रमांकावर होत्या. 2009 मध्ये रोशनी यांनी शिखर मल्होत्रा यांच्यासह लग्न केले. त्यांचे पती एचसीएल हेल्थचे उपाध्यक्ष आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या आकडेवारीनुसार रोशनी जगातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत महिला बनली आहे. भारतातील तिसरी सर्वात श्रीमंत भारतीय बनली आहे. याशिवाय, ती भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती देखील बनली आहे.
उत्तराधिकार नियोजनाचा एक भाग म्हणून, एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांनी एचसीएल कॉर्पोरेशन आणि वामा दिल्ली सारख्या प्रमोटर संस्थांमधील त्यांचे 47 टक्के हिस्सेदारी त्यांच्या मुलीला भेट म्हणून दिली आहे. एकदा गिफ्ट डीड ट्रान्सफर पूर्ण झाले की, तिला एचसीएल कॉर्प आणि वामावर बहुमत नियंत्रण मिळेल. ज्यामुळे ते एचसीएल इन्फोसिस्टम्स आणि एचसीएलटेकमधील सर्वात मोठे शेअरहोल्डर बनेल. आता सध्या, रोशनी नादरचा दोन्ही कंपन्यांमधील एकूण हिस्सा 57 टक्क्यांहून अधिक झाला आहे.
शिव नादर यांनी 1976 मध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीजची (HCL) स्थापना केली. रोशनी वयाच्या 27 व्या वर्षी एचसीएल कॉर्पोरेशनची कार्यकारी आणि सीईओ बनल्या. कमी वयातच मोठी उंची गाठणाऱ्या रोशनी या भारतातील यशस्वी उद्योजक महिलांपैकी एक आहेत. वडील शिव नादर यांच्या पावलावर पाऊल ठेवत रोशनीने यांनी त्यांचे कौशल्य सिद्ध केले आहे आणि कंपनीला यशस्वी टप्प्यावर पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावली. कोशनी नादर यांच्या कंपनीच्या व्यवसायाचा कारभार हा जगभरातील 52 देशांमध्ये चालतो.
दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमध्ये रोशनी यांचे शिक्षण झाले. उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेली. कम्युनिकेशन स्टडीज, रेडिओ, चित्रपट आणि टीव्हीचा अभ्यास केल्यानंतर रोशनी यांनी निर्माती म्हणून काम केले. अनेक नामांकित न्यूज चॅनेलमध्ये त्यांनी न्यूज अँकर म्हणूनही काम केले.