3 Idiots: ‘महाराष्ट्र शाहीर’च्या यशानंतर ‘थ्री ईडियट्स’मधील मिलीमीटर दिसणार या चित्रपटात

0
12
3 Idiots: ‘महाराष्ट्र शाहीर’च्या यशानंतर ‘थ्री ईडियट्स’मधील मिलीमीटर दिसणार या चित्रपटात


दुष्यंत पुढे सांगतो की, नशिबाने आजवर मी केलेल्या भूमिकांमध्ये मला गेटअप साठी जास्त महत्व द्यावे लागले होते. थ्री ईडियट मध्ये मी नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला तरुण होतो, धर्मवीर मध्ये दिघे साहेबांच्या तरुण काळातला मित्र होतो, तर महाराष्ट्र शाहिर मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तरुणपणातील भूमिका होती. आता शिष्यवृत्ती सिनेमात मी जबाबदार शिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे, यासाठी देखील माझा वेगळा गेटअप आहे. लवकरच तो तुमच्यासमोर येणार आहेच. जून महिन्यात शिष्यवृत्ती सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात माझ्या सोबत कमलेश सावंत, अनिकेत केळकर, उदय सबनीस, अंशूमन विचारे या कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका असून रुद्र ढोरे प्रमुख बालकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.



Source link