Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेश26/11 Attack Accused Hafiz Saeed | ‘२६/११ हल्ल्याचा आरोपी हाफिज सईदचे प्रत्यार्पण...

26/11 Attack Accused Hafiz Saeed | ‘२६/११ हल्ल्याचा आरोपी हाफिज सईदचे प्रत्यार्पण करा’ अखेर भारताने टाकला फास; पाकिस्तानकडे केली मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)

26/11 Attack Accused Hafiz Saeed | ‘२६/११ हल्ल्याचा आरोपी हाफिज सईदचे प्रत्यार्पण करा’ अखेर भारताने टाकला फास; पाकिस्तानकडे केली मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Extradition of 26/11 attack accused Hafiz Saeed' India finally spreads its claws; Demand made to Pakistan

External Affairs Ministry on Hafiz Saeed : परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करीत असताना म्हणाले की, भारतात अनेक प्रकरणांमध्ये हाफिज सईद आरोपी आहे. तसेच, संयुक्त राष्ट्रांनी त्याला प्रतिबंधित दहशतवादी म्हणून घोषित केलेले आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईद याला भारताच्या स्वाधीन करावे, अशी विनंती भारताने पाकिस्तानकडे केली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत बोलत असत असताना दिली.

हाफिज सईदचे भारताकडे प्रत्यार्पण करावे

नियमित पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना ते म्हणाले की, भारतातील अनेक प्रकरणांचा तपास करण्यासाठी हाफिज सईदला ताब्यात घेण्याची गरज आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनीही त्याला प्रतिबंधित दहशतवादी घोषित केलेले आहे. भारतातील काही प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी हाफिज सईदचे भारताकडे प्रत्यार्पण करावे, अशी विनंती संबंधित कागदपत्रांसह पाकिस्तान सरकारला केली आहे, असे बागची पत्रकार परिषदेत म्हणाले.

कुटुंबियांचे हित आमच्यासाठी महत्त्वाचे

भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारने फाशीची शिक्षा सुनावली होती. काल (दि. २८ डिसेंबर) ही शिक्षा मागे घेतल्याची बातमी समोर आली होती. या विषयावर भाष्य करताना अरिंदम बागची म्हणाले, कतारच्या विषयामध्ये मी अधिक टिप्पणी करू शकत नाही. कारण अजून आदेशाची कॉपी यायची बाकी आहे. हे प्रकरण संवेदनशील आहे. आठ भारतीय माजी नौदल अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे हित आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रकरणावर भाष्य करण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल.

 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments