2 Kerala doctors died Due To Google Map | गुगल मॅपमुळे दोन डॉक्टरांचा मृत्यू, चुकीच्या रस्त्यानं गाडी नेत घुसवली थेट नदीत! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
6
2 Kerala doctors died Due To Google Map | गुगल मॅपमुळे दोन डॉक्टरांचा मृत्यू, चुकीच्या रस्त्यानं गाडी नेत घुसवली थेट नदीत! | Navarashtra (नवराष्ट्र)


google map

गुगल मॅप पाहताना कार चालवताना झालेल्या चुकीमुळे केरळमध्ये दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची कार नदीत पडली होती. ड्रायव्हरने चुकून नदीला पुराचा रस्ता समजला होता.

कोची :  आजकाल प्रवासादरम्यान गुगल मॅप (Google map) वापरणं खूप सामान्य झालं आहे. आता आपण कमी असो की जास्त पत्ता निट नसेल माहित तर गुगल मॅपची मदत घेतो. परंतु अनेक वेळा तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहिल्याने आपल्याला फायदा होण्यापेक्षा त्रास होऊ शकतो. असाच प्रकार केरळमधील दोन डॉक्टरांच्या बाबतीत घडला. गुगल मॅपमुळे त्यांना जीव गमवावा लागला () आहे. गुगल मॅपच्या साहाय्याने जातान रस्ता चुकल्याने गाडी थेट घुसली त्यामुळे नदीत बुडाल्याने दोन्ही डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे रस्ता दिसला नाही

मिळालेल्या माहितीनुसार,  29 वर्षीय अद्वैत आणि 29 वर्षीय अजमल हे दोन्ही डॅाक्टर मित्र खासगी रुग्णालयात काम करत होते. हे दोघेही कोची येथील ते कोडुंगल्लूरहून त्यांच्या इतर मित्रांसोबत पार्टी करुन परतत होते. यादरम्यान मुसळधार पाऊस पडत होता. त्यांचा मार्ग चुकू नये म्हणून ते गुगल मॅप वापरत होते.  कार चालवणाऱ्या व्यक्तीला नदीला पाणी साचलेला रस्ता समजला. त्याने कार पुढे ढकलली, त्यामुळे कार नदीत पडली आणि बुडू लागली. अद्वैत आणि अजमल वेळेत गाडीतून बाहेर पडू शकले नाहीत. तीन जण बाहेर येण्यात यशस्वी झाले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.






Source link