Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेश1 लाखाचे मॅकबुक 35 हजार रुपयांनी स्वस्त! फ्लिपकार्टवर बंपर सेलचा घ्या फायदा

1 लाखाचे मॅकबुक 35 हजार रुपयांनी स्वस्त! फ्लिपकार्टवर बंपर सेलचा घ्या फायदा

1 लाखाचे मॅकबुक 35 हजार रुपयांनी स्वस्त! फ्लिपकार्टवर बंपर सेलचा घ्या फायदा

[ad_1]

Flipkart Big Upgrade Days Sale: तुम्ही आयफोन किंवा अ‍ॅपलचे कोणते नवे प्रोडक्ट घेऊ इच्छित असाल तर फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरु आहे. फ्लिपकार्ट अपग्रेड डेज सेलचा फायदा घ्यायला विसरु नका. या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये अ‍ॅपलचे प्रोडक्ट खरेदी करुन तुम्ही तुमचे हजारो रुपये वाचवू शकता. अ‍ॅपलच्या कोणत्या प्रोडक्टवर सूट मिळतेय? जाणून घेऊया. 

अ‍ॅपल मॅकबुक एअर एमआय 1 

अ‍ॅपलचे मॅकबुक लॉन्च झाले तेव्हा त्याची किंमत 1 लाख रुपये होती. आता त्यावर 31 हजार 910 रुपयांची सवलत मिळतेय. याची किंमत 67 हजार 990 रुपये आहे. याशिवाय तुम्हाला आयसीआयसीआय किंवा एचडीएफसी क्रेडीट कार्डद्वारे ईएमआयवर घेतल्यास 3500 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळू शकते. यानंतर 1 लाखात मिळणाऱ्या मॅकबुकची किंमत 64 हजार 490 रुपये होईल. 

अ‍ॅपल सेकंड जनरेशन एअरपॉड्स 

या एअरपॉड्सची किंमत 12 हजार 900 रुपये आहे. पण आता 4 हजार 901 रुपयांच्या सवलतीसह ते 8 हजार 499 रुपयांना मिळत आहेत. तुम्ही बॅंक ऑफरचा फायदा घेतलात तर तुम्हाला 1500 पर्यंत अधिकची सवलत मिळेल. सर्व ऑफर्स एकत्र केल्यास 6,999 रुपयांची सवलत मिळेल. 

अ‍ॅपल वॉच सिरीज 9 

अ‍ॅपलच्या या वॉच सिरीजवर 8 हजार 901 रुपयांची सवलत मिळत आहे. ग्राहकांनी अ‍ॅक्सिस बॅंक क्रेडिट कार्डचा वापर केला तर ईएमआयवर 2 हजारपर्यंत सवलत मिळेल. ज्यानंतर वॉचची किंमत 30 हजार 999 रुपयांनी कमी होईल. 

अ‍ॅपल आयफोन 15 

आयफोन 15 वरदेखील फ्लिपकार्टमध्ये मोठे डिस्काऊंट मिळत आहे. 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉंच करण्यात आलेला फोन आता 13 हजार 401 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटवर मिळतोय. जर तुम्ही अ‍ॅक्सिस बॅंक क्रेडिट कार्ड वापरुन ईएमआयवर आयफोन घेत असाल तर 1500 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल. यानंतर आयफोन 15 ची किंमत 64 हजार 999 रुपये होईल. 

अ‍ॅपल आयपॅड नाइन्थ जनरेशन 

अ‍ॅपल आयपॅड नाइन्थ जनरेशनवर 7 हजार 901 रुपयांची सवलत मिळणार आहे. त्यामुळे आता फिल्पकार्टच्या या सेलमध्ये अ‍ॅपल आयपॅड नाइन्थ जनरेशन 24 हजार 999 इतकी झालीय. यासोबतच बॅंक ऑफरचा फायदा घेतल्यास तुम्ही हा प्रोडक्ट 23 हजार 499 रुपयांमध्ये घेऊ शकता.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments