Tuesday, August 18, 2026
Homeमनोरंजनसोलापुरात १३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचा फटका

सोलापुरात १३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचा फटका

सोलापुरात १३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचा फटका

[ad_1]

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे रस्त्यांसह ग्रामीण भागात शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. सोलापूर शहरात एकाच दिवशी तब्बल ११० मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस पडला आहे. यासह जिल्ह्यातील १३ गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे शेतांमध्ये पाणी घुसले असून, उन्हाळी पिकांसह फळबागांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३२.८ मिलीमीटर इतका सरासरी पाऊस झाला. सर्वाधिक ६२.९ मिमी पाऊस एकट्या उत्तर सोलापूर तालुक्यात पडला. माढा-५२.४, माळशिरस-४५.१, बार्शी-३७.२, करमाळा-३२.७, पंढरपूर-३१.३, मोहोळ-२९.२, दक्षिण सोलापूर-२३.३, अक्कलकोट-२३.२, सांगोला-१७.८ आणि मंगळवेढा-९.७ याप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे.

या पावसाचा जोर सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर, माढा, माळशिरस, बार्शी व करमाळ्यात होता. सोलापूर शहरात तब्बल ११० मिमी एवढा मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांचे हाल झाले. विशेषत: या पहिल्याच पावसाने महापालिका यंत्रणेच्या मर्यादा समोर आल्या. पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरवस्था पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाचा जोर वाढल्याने गुडघाभर पाणी साचले होते. त्यातून वाहने चालवताना नागरिकांची तारांबळ उडाली होती.

जिल्ह्यात विविध १३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात उत्तर सोलापूर तालुक्यात मार्डी (११०) व शेळगी (६६) या मंडळांचा समावेश आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी (९९.३), कुर्डूवाडी (७८), म्हैसगाव (७१.१) आणि रोपळे (७०.५) येथे अतिवृष्टी झाली. तर पंढरपूर तालुक्यातील करकंब (७१) व पटवर्धन कुरोली (७१) या दोन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीसह घरांची हानी झाली. बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला महसूल मंडळात ९९.३ मिमी पावसाच्या रूपाने अतिवृष्टी झाली. तर करमाळा तालुक्यातील सालसे (७०.५) आणि केम (६९) आणि माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे ६५.३ मिमी पाऊस होऊन अतिवृष्टी अनुभवास आली.

एकाच दिवशी एकाच महसूल मंडळात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला तर त्यास नियमानुसार अतिवृष्टी मानले जाते. गुरुवारी दुपारपासून आकाश ढगांनी व्यापले होते. सायंकाळी पुन्हा पाऊस पडण्याची चाहूल लागली होती. वीजपुरवठाही अधुनमधून खंडित होत आहे.चौकट

नालेसफाई धीम्या गतीनेसोलापूर शहरात वळिवाच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना दुसरीकडे महापालिकेची यंत्रणा जागी झाली. पावसाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु ही कामे धीम्या गतीने होत आहेत. या कामांची पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी पाहणी केली. एकूण १७८ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या सोलापूर शहरात ४२ किलोमीटर लांबीचे उघडे नाले आहेत. तर भूमिगत गटारी २१७ किलोमीटर लांबीच्या आहेत. पावसाचे पाणी पुणे रस्त्यावर हांडे प्लॉट आणि बाळे परिसरासह इतर काही ठिकाणी घरांमध्ये शिरले होते. या भागात पालिका आयुक्त डॉ. ओंबासे यांनी भेट देऊन पाहणी केली. बाधित परिसरात आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments