साताऱ्यात उदयनराजेंच्या वाढदिवसाला बैलगाडा शर्यत, बकासुरने मैदान मारलं, वाऱ्याच्या वेगाने धावला

0
1


Satara Bailgada race: साताऱ्यातील लिंब येथे रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ‘उदयनराजे केसरी’ भव्य बैलगाडा शर्यतीत ‘बकासुर आणि बादल’ ही बैलजोडी विजयी ठरली आहे. सातारा तालुक्यातील लिंब येथे रक्षक प्रतिष्ठानच्यावतीने ‘उदयनराजे केसरी’ भव्य बैलगाडा शर्यतीचे (Bullock cart race) आयोजन करण्यात आले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर यांच्यावतीने ओपन बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते. यासाठी राज्यभरातून हजारो स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यावर्षी पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत 1 लाख 51 हजार 7 रुपये या प्रथम क्रमांकाचे बक्षीस बकासुर (Bakasur) आणि बादल या बैल जोडीला मिळाले आहे. यावेळी मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जिल्हासह पर जिल्ह्यातून बैलगाडा शौकिनांची गर्दी पाहायला मिळाली. (Satara news)

आणखी वाचा



Source link