Thursday, August 27, 2026
Homeसातारासातारा: गोटेजवळ पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; १५ जखमी

सातारा: गोटेजवळ पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; १५ जखमी

सातारा: गोटेजवळ पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; १५ जखमी

[ad_1]








कराड: पुढारी वृत्तसेवा: पाटण (जि. सातारा) येथील लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपवून परत येत असताना कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत विमानतळाजवळ पोलिसांच्या बसचा अपघात झाला. त्यामध्ये तासगाव तालुक्यातील तुरची येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरमधील पंधरा पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर  तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पोलिसांची विचारपूस केली. आज (दि. ८) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघात कसा झाला?

  • बस विमानतळाजवळ आली असता अचानक ट्रक आडवा
  • चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.
  • बस रस्त्याकडेच्या पडक्या घराला जावून धडकली

संदीप पवार, लक्ष्मण सुतार व अजीत नलवडे अशी गंभीर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इतर पोलीस किरकोळ जखमी झाले. समोरून येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने बस रस्त्याकडेच्या पडक्या घराला जावून धडकली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण विधानसभा मतदारसंघात चार दिवसांपासून संबंधित पोलीस बंदोबस्तावर होते.  मतदान प्रक्रिया मंगळवारी संपल्यानंतर आज सकाळी खासगी बसमधून पोलीस तुरचीकडे रवाना होण्यासाठी निघाले होते.

जिल्हा पोलीस प्रमुखांची रूग्णालयात घेतली जखमींची विचारपूस

दरम्यान, त्यांची बस विमानतळाजवळ आली असता अचानक ट्रक आडवा आल्याने चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. बसमधील १५ पोलीस जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर गंभीर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सातारचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, कराड पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

हेही वाचा 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments