Wednesday, August 19, 2026
Homeसातारासातारा : कराडात दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी गजाआड | पुढारी

सातारा : कराडात दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी गजाआड | पुढारी

सातारा : कराडात दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी गजाआड | पुढारी

[ad_1]








कराड, पुढारी वृत्तसेवा : Karad Crime : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या टोळीतील चौघा संशयितांना जेरबंद करण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. एका संशयिताने पलायन केले असले तरी संशयितांकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल, एक गावठी कट्टा, पाच राऊंड यासह घातक हत्यारे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

परशुराम उर्फ परशा रमेश करवले (वय 23), निशीकांत निवास शिंदे (वय 21), तुषार उर्फ बारक्या सुभाष थोरवडे (वय 23), आकाश उदय गाडे (वय 19) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्या नावांची सत्यता पडताळण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे. हे सर्व संशयित कराड परिसरातील आहेत. तर एक अनोळखी संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत.

शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमनजीक उत्तरालक्ष्मी देवी मंदिरासमोरील मार्गालगत असलेल्या झाडाझुडपाच्या आडोशास अंधारामध्ये काही संशयित असल्याची माहिती कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूूर व पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी केलेल्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन संशयितांवर झडप घातली. यावेळी एक संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला.

ताब्यातील संशयितांकडे कसून चौकशी करत झडती घेतली असता दोन देशी बनावटीचे पिस्टल, 5 जिवंत राऊंड, एक गावठी कट्टा व गावठी कट्टयामध्ये वापरणेत येणारा राऊंड, एक लोखंडी टॉमी, मिरची पूड, दोन राखाडी व एक चॉकलेटी रंगाची माकड टोपी, एक काळे रंगाचा कापडी मास्क तसेच दोन निळे रंगाचे हॅन्ड ग्लोज मिळून आले आहेत. त्यानंतर याप्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी काही गुन्ह्यात संशयितांचा सहभाग आहे का? याचा पोलिस शोध घेत आहेत.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments