Friday, August 21, 2026
Homeआरोग्यसकाळी उठताच 'ही' हिरवी पानं चावून खा, मिळतील 6 जबरदस्त फायदे; पाहून...

सकाळी उठताच ‘ही’ हिरवी पानं चावून खा, मिळतील 6 जबरदस्त फायदे; पाहून व्हाल आश्चर्यचकित

सकाळी उठताच ‘ही’ हिरवी पानं चावून खा, मिळतील 6 जबरदस्त फायदे; पाहून व्हाल आश्चर्यचकित

[ad_1]

Neem Leaves Benefits : आयुर्वैदात झाडं पानं फुलांना अतिशय महत्त्व आहे. आयुर्वैदात जुडीबुटी आणि पानं, फुलांपासून औषधं तयार करण्यात येते. निसर्गाने दिलेल्या वरदानातील एक महत्त्वाच झाडं आहे ते म्हणजे कडुलिंबाचं…कडुलिंबांची पानं ही खाण्यासाठी कडू असतात पण ती आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानली जातात. महाराष्ट्रात गुढीपाडव्या या सणाच्या दिवशी कडुलिंबाची पानं खाण्याची परंपरा आहे. यामागे कारण म्हणजे कडुलिंबाच्या पानांमध्ये तुम्हाला अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आढळतात. जे तुमच्या शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करण्यास उपयुक्त ठरतात. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी 3-4 मऊ कडुलिंबाची पाने चावून खाल्ली तर ते शरीराला अनेक समस्यांपासून तुम्हाला आराम देतात. पोटाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी देखील त्याचे सेवन खूप उपयुक्त मानले जाते. कडुलिंबाची पानं दरोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास कोणत्या समस्या दूर होण्यास मदत मिळते ते पाहा. 

कडुलिंबाची पाने चावण्याचे फायदे

1. ब्लॉटिंग

जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटफुगीची समस्या वारंवार होत असेल तर कडुलिंबाची पाने तुमच्यासाठी फायदेशीर मानली गेली आहे. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास तुम्हाला जबरदस्त फायदा मिळू शकतो. 

2. रक्तातील साखर नियंत्रणात राहिल

दररोज कडुलिंबाची पाने चावून चावून खाल्लास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास तुम्हाला फायदा मिळतो. त्यामुळे ज्यांना शूगरची समस्या असलेल त्यांनी डॉक्टरच्या सल्लाने कडुलिंबाची पानं खावीत. 

3. त्वचा

रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावल्याने त्वचा आतून स्वच्छ होते, ज्यामुळे सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात मदत मिळते आणि त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. ज्या लोकांना खूप मुरुमे येतात त्यांनी हे त्यांच्या दिनचर्येत कडुलिंबाची पानं समाविष्ट करणे अतिशय फायदेशीर मानले गेले आहे. 

4. लठ्ठपणा 

कडुलिंब खाल्ल्याने चयापचय सुधारण्यास मदत मिळते आणि भूक वाढण्यास फायदा होतो. यामुळे वजन कमी होण्यास तुम्हाला मदत मिळते. 

5. यकृत

कडुलिंब यकृताला विषमुक्त करण्यास फायदेशीर मानले गेले आहे. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावल्याने यकृत निरोगी राहतं. 

6. कॅविटी 

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावल्याने दातांच्या कॅविटीपासून आराम मिळतो. तोंड स्वच्छ ठेवण्यासही ते फायदेशीर आहे. 

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments