Sunday, September 13, 2026
Homeसाताराशिक्षकी पेशाला काळिमा : शिक्षकाचा विद्यार्थिनींवर अत्याचार | पुढारी

शिक्षकी पेशाला काळिमा : शिक्षकाचा विद्यार्थिनींवर अत्याचार | पुढारी

[ad_1]








साखरवाडी; पुढारी वृत्तसेवा : फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर त्याच शाळेतील क्रीडा शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानवतेला काळिमा फासणार्‍या या घटनेने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाच्या विरोधात विनयभंग व पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार एकनाथ मोहिते (वय 50, रा. साखरवाडी, ता. फलटण) असे संशयित क्रीडा शिक्षकाचे नाव आहे.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलीने काही दिवसांपूर्वी तिच्यावर संशयित क्रीडा शिक्षक मोहिते याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना तिच्या मावस भावास सांगितली होती. याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीच्या मावस भावाने दि. 8 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन ई कम्प्लेंट दाखल केली होती. यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद केली होती. ही ऑनलाईन तक्रार दाखल होताच संशयीत क्रीडा शिक्षक तुषार मोहिते हा शिक्षक पसार झाला आहे.

दाखल तक्रारीच्या अनुषंगाने याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात दि. 10 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल झाली. यामध्ये एका शाळेत इयत्ता 10 वी मध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी डिसेंबर 2023 मध्ये सायंकाळी 5 ते 6 दरम्यान शाळेच्या आवरामधील जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेली होती. त्यावेळी क्रीडा शिक्षक तुषार मोहिते याने लैंगिक अत्याचार केला. तसेच याच शाळेमधील 11 वी मध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवरही डिसेंबर 2023 मध्येच वडूज ता.खटाव येथील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर तुषार मोहिते याने त्याच्या चारचाकीमधून इतर विद्यार्थिनींना त्यांच्या घरी सोडल्यानंतर रस्त्यामध्ये लैंगिक अत्याचार केला. ऑनलाईन तक्रारीनंतर या घटनेला वाचा फुटली असून या घटनेने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या नराधम शिक्षकाकडून असे आणखी प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ज्या-ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे अशा मुली व पालकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोनि सुनील महाडिक यांनी केले आहे.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments