
छोट्या पडद्यावरील लहान मुलांची आवडती मालिका म्हणून ‘शाका लाका बूम बूम’ पाहिली जायची. शाळेतून आल्यावर दप्तर टाकून लहान मुले सर्वात आधी टीव्ही सुरु करायची आणि ही मालिका पाहायची. या मालिकेतील संजूकडे एक जादूची पेन्सिल होती. या मालिकेने जवळपास सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेत मुख्य भूमिका सकारणारा संजू म्हणजेच किंशुक वैद्य हा चांगलाच चर्चेत राहिला. आता पुन्हा एकदा अनेक वर्षांनंतर तो चर्चेत आला आहे. कारण किंशुक हा विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.








