Thursday, October 8, 2026
Homeसाताराशशिकांत शिंदेंसाठी पवारांच्या ३ सभा

शशिकांत शिंदेंसाठी पवारांच्या ३ सभा

[ad_1]

Maharashtra Politics

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सातारा जिल्ह्यात खा. शरद पवारांच्या सातारा, वाई व पाटण येथे जाहीर सभा होणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी, खा. अमोल कोल्हे, युवा नेते अदित्य ठाकरे यांच्याही सभा होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी खा. शरद पवारांच्या 22 दिवसांत तब्बल 50 सभा घेण्याचे नियोजन महाविकास आघाडीने केले आहे. त्यातील तीन सभा या सातारा लोकसभा मतदारसंघात आ. शशिकांत शिंदे यांच्यासाठी घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये गेले अनेक दिवस कार्यकर्त्यांची मागणी असलेल्या वाई येथे सोमवार, दि. 29 एप्रिल रोजी खा. शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेला खा. अमोल कोल्हे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

मंगळवार, दि. 30 एप्रिल रोजी पाटण येथे खा. शरद पवार, शिवसेना युवा नेते आ. आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे, तर शनिवार, दि. 4 मे रोजी सातारा येथे खा. शरद पवार, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांची प्रचार सांगता सभा होणार आहे.
या सर्व सभांचे नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकार्‍यांनी कंबर कसली आहे. या सभा यशस्वी करण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती या पदाधिकार्‍यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments