Wednesday, September 16, 2026
Homeसातारालय भारी... चक्क बांधावर जाऊन लाडकी बहीण योजनेचे भरले अर्ज; अंगणवाडी ताईंचं...

लय भारी… चक्क बांधावर जाऊन लाडकी बहीण योजनेचे भरले अर्ज; अंगणवाडी ताईंचं होतंय कौतूक

[ad_1]

सातारा/मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) अंमलबजावणीला सुरुवात झाली असून लाडक्या बहि‍णींचे अर्ज भरुन घेण्याचं काम सुरू आहे. राज्य सरकारकडून विविध प्रणालींमार्फत राज्यातील पात्र व लाभार्थी महिलांचे अर्ज भरुन घेतले जात असून महिला भगिनींना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशच मुख्यमंत्री (Chief minister) व उपमुख्यमंत्र्‍यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाही आपल्या स्तरावर अधिक सहज व सुलभ रितीने ही योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. सध्या पाऊस पडल्याने शेतात पेरणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे, महिला (Women) भगिनींसाठी थेट बांधावर पोहोचून लाडक्या बहि‍णींना या योजनेचे महत्त्व समजावत त्यांचे अर्ज भरुन घेतले जात आहेत.  

लाडक्या बहीण योजनेसाठी कुणीही महिला भगिनींकडून जादा पैसे किंवा लाचेची मागणी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही जिल्हा प्रशासनाला संबंधित योजना सहज सुलभरितीने राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याच, अनुषंगाने सरकारने या योजनेतील कागदपत्रांची पूर्तता आणखी कमी केली असून केवळ रेशनकार्ड, मतदान ओळखपत्रांच्या आधारेही योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेतील उत्पन्न प्रमाणपत्राची अट आता शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे, तहसील किंवा सेतू कार्यालयात महिला भगिनींच्या झालेल्या रांगा कमी झाल्या आहेत. दुसरीकडे प्रशासनही आपल्या परीने ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी म्हणून कार्यमग्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे कामात व्यस्त असतात अशाच शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देत त्यांचा अर्ज भरुन देण्याचं काम मोडकवाडी जिंती येथील अंगणवाडी सेविका करत आहेत. सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे कामात व्यस्त असतात. अशाच शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देत शिंगणवाडी येथील अंगणवाडी सेविकांनी महिला भगिनींचे अर्ज भरुन घेतले. त्यामुळे, सातारा जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या पद्धतीचे सर्वत्र कौतूक आणि स्वागत होत आहे. 

सर्वच जिल्ह्यात घरोघरी अर्जाची मोहिम राबवावी

साताऱ्याप्रमाणेच राज्यातील सर्वच जिल्ह्यात अशाप्रकारे महिलांना सोयीचं आणि सहजपणे ह्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने काम करण्याची मागणी होत आहे. सध्या शेतातील पेरणीची व इतरही कामे सुरू आहे. त्यामुळे, ग्रामीण भागात महिला भगिनी शेतातील कामात व्यस्त आहेत, अशा लाडक्या बहि‍णींसाठी अंगणवाडी सेविकांसह जिल्हा प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही योजना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे.

याठिकाणी भरले जातात अर्ज 

दरम्यान, सध्या नारीशक्ती दूत अॅपद्वारे या योजनेचा अर्ज भरला जात आहे. तसेच, ऑनलाईन पोर्टलद्वारे, सेतू कार्यालात, पंचायत समितीमधील महिला व बालकल्याण विभागातही लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेतले जात आहेत. तर, विविध राजकीय पक्षांनीही त्यांच्या कार्यालयात अर्ज भरुन घेण्याचं काम सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. 

अधिक पाहा..



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments