Tuesday, August 18, 2026
Homeसाताराराज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीवरुन साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ता आक्रमक; राजभवनासमोर आत्मक्लेश आंदोलनाचा...

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीवरुन साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ता आक्रमक; राजभवनासमोर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा | पुढारी

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीवरुन साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ता आक्रमक; राजभवनासमोर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा | पुढारी

[ad_1]








सातारा; पुढारी वृत्तसेवा : विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत संपत  असून या सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून होत असते. मात्र अद्यापही ही नियुक्ती झालेली नाही. याच कारणास्तव सातारा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने निकषानुसार राज्यपालांना ई-मेल द्वारे निवेदन देऊन नवीन सदस्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी केली आहे. ही नियक्ती झाली नाही नाही तर उच्च न्यायालयात फेरजनहित याचिका दाखल करणार, तसेच राजभवनासमोर आत्मक्लेश आंदोलन देखील करण्याचा इशारा या तरुण सामाजिक कार्यकर्त्याने दिला आहे. सुशांत मोरे असे या तरुण सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे.

मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांना दिलेल्या निवेदनात, विधान परिषद सभागृह हे विचारवंतांचे मानले जाते. या सभागृहात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला जातो. साहित्यिक ,पत्रकार, विचारवंत, सहकार, सामाजिक चळवळीशी संबधित व्यक्ती या सभागृहात असल्या पाहिजेत हे निकष आहेत. सध्या विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत संपत असून लवकरच या जागी नवीन सदस्यांची आपल्याकडून केली जाणार आहेत.  मात्र अद्यापही ही सदस्य निवड प्रक्रिया झालेली नाही.

मोरे म्हणाले की, मुदत संपलेल्या सदस्यांच्या नियुक्तीबाबत प्रचलित निकष न पाळल्याने मी उच्च न्यायालयात जनहित याचिका (Wpst/17405/2014) दाखल केली आहे. तिची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यावेळेस राजकीय पक्षांनी शिफारस केलेले सदस्य प्रचलित निकषात बसत असतील तरच त्यांची नियुक्ती करण्यात यावी. जर निकषाप्रमाणे नियुक्ती झाली नाही तर मला पुन्हा फेर जनहित याचिका दाखल करावी लागेल. तसेच राजभवनासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असाही इशारा मोरे यांनी दिला आहे.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments