
Egypt Pharaoh Cancer Treatment : इजिप्तमध्ये बंद शवपेट्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे होत असतात. 1922 मध्ये तुतानखामुनची कबर उघडल्यानंतर जगाला हादरुन सोडलं होतं. त्यानंतर इथे सुरु असलेल्या संशोधनातून अनेक गुढ उकले जात आहे. खरं तर त्या काळात खूप विचित्र घटना घडल्या ज्यामध्ये कबर उघडणारे अनेक लोक गूढपणे मरण पावले. त्यानंतर अशी अफवा पसरली की, फारो नावाच्या राजाच्या शापामुळे हे मृत्यू होत आहेत. अशी अफवा होती की, जो कोणी त्याची कबर उघडेल तो आजाराने किंवा अचानक त्याचा मृत्यू होईल. अखेर संशोधकांना या मृत्यूमागील रहस्य उघडण्यात यश आलं आहे.
‘या’ कारणामुळे झाला त्यांचा मृत्यू!
संशोधकांनी केलेल्या शोधानंतर असा दावा केला की, कुठल्याही शापामुळे शास्त्रज्ञांचा मृत्यू नाही तर कबरींमध्ये वाढणाऱ्या एका धोकादायक बुरशीमुळे होतो. शेकडो वर्षांनंतर त्या उघडल्यानंतर, त्यामध्ये असलेल्या एस्परगिलस फ्लेव्हस नावाच्या बुरशीचे बीजाणू हवेत पसरले. हे कबरी उघडणाऱ्या लोकांच्या श्वासाद्वारे शरीरात शिरले आणि संसर्ग झाला ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली. त्यातून त्यांचा मृत्यू झाला.
फारोचा शाप – आशेचा किरण
पण आता शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की तुतानखामुनच्या थडग्याचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लॉर्ड कार्नाव्हॉनला या बुरशीमुळे न्यूमोनिया झाला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशाप्रकारे, फारोचा शाप प्रत्यक्षात एक नैसर्गिक घटना होती जी लोकांना शाप वाटत होती, जी आता वरदान असल्याच या संशोधनातून पुढे आलं आहे.
कर्करोगावर उपचार करण्यास मदत!
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील संशोधकांनी एक आश्चर्यकारक शोध लावला आहे, त्यांनी म्हटलंय की एस्परगिलस फ्लेव्हसमध्ये असलेल्या काही संयुगांनी कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास फायदेशीर असल्याच त्यांनी म्हटलं आहे. संशोधकांनी या बुरशीपासून एस्पेरिजिमायसिन नावाचे चार नवीन पेप्टाइड्स वेगळे केले आहेत. पेप्टाइड्स कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. जर ही बुरशी चाचण्यांमध्ये उपयुक्त ठरली तर ती कर्करोगाच्या उपचारात एक मैलाचा दगड ठरेल असं संशोधकांचं म्हणं आहे.