
या पोस्टमध्ये महिला एचआरने सांगितलं की कंपनी मुंबईत एका ग्राफिक डिझायनरच्या शोधात आहे. या पदासाठी उमेदवाराकडे कमीत कमी एक वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव हवा. त्यानंतर कंपनीला उमेदवाराकडून कोणत्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, याची माहिती दिली आहे. त्यात सर्वात पहिली अट होती की, मराठी माणसाला येथे अर्ज करू शकत नाही, किंवा येथे मराठी लोकांचे स्वागत नाही.






