‘मी आज दादांसोबत बारामतीला येतोय, संध्याकाळी घरी मुक्कामाला येईन…’ असं सांगणारे विदीप तिरंग्

0
47


सातारा: उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेल्या विमान अपघातात त्यांचे सुरक्षारक्षक पोलिस हवालदार विदीप जाधव (Videep Jadhav) (४३) यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी संध्या (३८), मुलगी नेत्रा (१४) आणि मुलगा अद्वीत (१०) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ते राहत असलेल्या ठाण्यातील विटावा भागात शोककळा पसरली आहे. मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगावचे ते रहिवासी होते. विदीप हे उपमुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक असले तरी त्यांनी पदाचा रुबाब दाखविला नाही, ते अगदी साधेपणाने वागत बोलत होते. त्यांची पोलिस अशीच ओळख होती. विदीप जाधव यांच्यावरती काल (बुधवार) रात्री उशिरा तरडगाव पालखी तळ परिसरात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या १० वर्षांच्या मुलाने सर्व विधी केले, ते सर्व चित्र पाहून उपस्थिताचे देखील डोळे पाणावले.(Videep Jadhav)

विदीप जाधव हे २००९ मध्ये मुंबई पोलिस दलात भरती झाले होते. २०१० पासून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा पथकात त्यांनी स्थान मिळवले. सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्या. जे. ए. सानप यांचे ते सुरक्षा रक्षक होते, त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा त्यांनी सांभाळली, त्यानंतर २०१९ पासून ते अजित पवार यांचे सावलीसारखे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असतानाच काल नियतीने त्यांच्यावर घाला घातला. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्या समवेत विदीप जाधव व इतर तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 संध्याकाळी घरी मुक्कामाला येईन…

विदीप जाधव यांनी ‘मी आज दादांसोबत बारामतीला येतोय, संध्याकाळी घरी मुक्कामाला येईन’ असं सांगितलं होतं, पण विदीप जाधव हे तिरंग्यात लपेटून परतल्याचे पाहून त्यांच्या वृद्ध आई वडिलांनी आणि पत्नीने केलेला आक्रोश उपस्थितांची काळीज चिरणारा होता. त्यांच्या पश्चात आई वडील, दोन बहिणी, तीन भाऊ, पत्नी संध्या व १३ वर्षांची मुलगी नेत्रा जाधव आणि दहा वर्षांचा मुलगा अद्विक जाधव ही दोन मुले असा परिवार आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम- (How did Ajit Pawar plane crash?)

पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती.
– बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे
– ILS (Instrument Landing System) सुविधा नाहीत.
– पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली.
– विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला.
– याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला.
– धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले.
– दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला.
– DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे.
– लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले.
– सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला
– रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले
– आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले.
– विमानात भीषण आग लागली
– आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही
– अपघाताचा तपास चालू आहे; DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.

आणखी वाचा



Source link