मिलिंद अहिवळे यांची थायलंड दूतावासात प्रकल्प अधिकारी पदी निवड

0
20
मिलिंद अहिवळे यांची थायलंड दूतावासात प्रकल्प अधिकारी पदी निवड

फलटण : मिलिंद दत्ता अहिवळे यांची थायलंड दूतावासात प्रकल्प अधिकारी पदी निवड झाली आहे . मिलिंद अहिवळे यांनी दिल्ली येथे १९ मे रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे . आर्थिक गुंतवणूक आणि चलत विषयक धोरणांची त्यांची सखोल माहिती असल्याने अहिवळे थायलंड आणि भारत यांच्यातील व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील .

यापूर्वी मिलिंद अहिवळे यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यकाळात त्यांना आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांच्या जटिल रचनेवर काम करण्यासाठी संधी मिळाली शिवाय , मिलिंद अहिवळे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी या नवीन भूमिकेसाठी त्यांची पात्रता आणखी मजबूत करते . इंग्लंडमधून फायनान्स मध्ये मास्टर ऑफ सायन्स (एम एस सी ) पदवी आणि फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून अर्थशास्त्रातील बॅचलर ऑफ आर्ट्स ( बी.ए) पदवीसह , मिलिंद अहिवळे आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरणांचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात .