Friday, August 21, 2026
Homeमनोरंजनमहेश मांजरेकर यांना कशी सुचली ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची कथा? काय म्हणाले...

महेश मांजरेकर यांना कशी सुचली ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची कथा? काय म्हणाले अभिनेते वाचाच…

महेश मांजरेकर यांना कशी सुचली ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची कथा? काय म्हणाले अभिनेते वाचाच…

[ad_1]

काय दाखवायचंय या चित्रपटातून?

या चित्रपटाच्या कथेविषयी बोलताना महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, ‘हा चित्रपट करताना मला आई-वडिलांचा छळ करणारा किंवा त्यांची संपत्ती विकणारा मुलगा दाखवायचा नव्हता. कारण मग कथानक खूपच रटाळवाणं झालं असतं. खऱ्या आयुष्यात असं करणारी मुलं फार कमी असतात. जास्तीत जास्त लोक म्हणतात की, आम्ही आमच्या आईवडिलांशी फार छान वागत आहोत. पण, खरंच आपण त्यांच्याशी चांगलं वागतो का? की आपण त्यांना केवळ गृहीत धरलेलं असतं? आई-वडील आहेत ते, तर त्यांना सगळ्याच गोष्टी कळतील, असं समजून आपण चालत असतो. अगदी चार एक दिवस फोन केला नाही, तर त्यांना समजेल की आपल्याला वेळ नाहीये. मात्र, आपण वेळ काढून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे हा चित्रपट करताना मला एखादा मुलगा किंवा सून कशी वाईट हे अजिबात दाखवायचं नव्हतं. पण, जे म्हणतात की आम्ही आमच्या आई-वडिलांची काळजी घेतो, खरंच ते ती काळजी घेतात का? याचीच एक गोष्ट मला चित्रपटातून दाखवायची होती. कारण या चित्रपटातला मुलगा हा मी आहे. हा चित्रपट करता करताना माझ्यासोबत जे घडले तेच मी लिहिले, त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा सगळ्यांनाच आपलासा वाटला. माझ्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी मी या चित्रपटात मांडल्या.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments