महाराष्ट्राचं कोण आहे इथे? तरुण पुढे येऊन म्हणाला ‘मी नाशिक….’; त्यानंतर पुढे काय झालं पाहा; हरियाणातील VIDEO तुफान व्हायरल

0
201
महाराष्ट्राचं कोण आहे इथे? तरुण पुढे येऊन म्हणाला ‘मी नाशिक….’; त्यानंतर पुढे काय झालं पाहा; हरियाणातील VIDEO तुफान व्हायरल


Viral Video: राज्यातील शाळांमध्ये हिंदी शिकवण्याच्या निर्णयानंतर सुरु झालेला वाद जीआर रद्द केल्यानंतर संपला असला तरी, मराठी भाषेच्या अस्मितेवरुन मात्र आता ठिकठिकाणी संघर्ष होताना दिसत आहे. एकीकडे मनसे आणि शिवसेना महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिकलीच पाहिजे असं आग्रह करत असताना, दुसरीकडे मुंबईत राहणारे इतर राज्यातील नेते त्यांना आव्हान देत आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिरा रोडमध्ये एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर हा वाद पेटला होता. त्यानंतर मराठी माणसांनीही मनसे, शिवसेनेसह मोर्चा काढत आपली ताकद दाखवून दिली. 

एखाद्या राज्यात वास्तव्य करताना तेथील प्रांतिक भाषा शिकावी की नाही यावरुन मतांतरं असून सोशल मीडियावर प्रत्येकजण व्यक्त होताना दिसत आहेत. मराठीसाठी सुरु असलेल्या लढ्याचं समर्थन करताना दक्षिणेतील राज्यांचं उदाहरण दिलं जात आहे. दाक्षिणात्या राज्यांनीही हिंदीची सक्ती स्विकारण्यास नकार दिला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान हरियाणातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. 

हा व्हायरल व्हिडीओ हरियाणाचा आहे. . या व्हिडीओत एक व्यक्ती शेतामध्ये उभी असल्याचं दिसत असून, मागे काहीजण काम करताना दिसत आहेत. यावेळी ती व्यक्ती जणू काही आपण आता मारणार आहोत अशा आवेशात टी-शर्टच्या बाह्या सरसावत ‘अरे महाराष्ट्राचं कोण आहे इथे’ अशी विचारणा करतो? यावेळी एक तरुण आपण आहोत असं सांगताच तो त्याला बोलावतो. 

थोडासा घाबरलेला तरुण जवळ आल्यानंतर तो त्याला कोणत्या गावचा आहेस असं विचारतो. त्यावर तो नाशिक असं उत्तर देतो. त्यानंतर तो त्याला हरियाणात बोल असं सांगतो. तरुण येत नाही म्हटल्यावर ‘मग इथे कसा आलास? इथे कसा काय काम करतोस?’  असा प्रश्न विचारतो. हे प्रश्न ऐकल्यावर तरुणाला काय करावं सुचत नाही. त्याच्या हालचालींवरुन तो प्रचंड घाबरलेला दिसत आहे. 

यानतंर ती व्यक्ती हसत ‘तुझा देश आहे, तू नाही तर कोण काम करणार’ असं हसत म्हणतो आणि मिठी मारतो. तुझा भारत देश आहे, जी मर्जी असे ते कर असं सांगत ती व्यक्ती तेथून जाते. 

@notthatmanusharma या इंस्टाग्राम अकाऊंटला हा व्हिडीओ शेअऱ करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी कमेंट्स करत आहेत.





Source link