मनोज जरांगेंच्या आंदोलनास रामदास आठवलेंचा पाठिंबा, पण..; आरपीआयच्या शिबिरात ठराव मंजूर

0
1


सातारा : मनोज जरांगे (Manoj jarange) पाटील यांच्या आंदोलनाला आरपीआय आठवले गटाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथील राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा ठराव मंजूर झाला. मुंबईतील आझाद मैदानात आपण 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. त्यानुसार, आंदोलनाची तयारी करुन ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर जाऊन त्यांनी आज शिवरायांचे दर्शन घेतले. दुसरीकडे त्यांच्या आंदोलनावरुन ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. त्यातच, आता मंत्री रामदास आठवले (Ramdas athvale) यांनी मनोज जरागेंच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचा ठरावच आरपीआयच्या शिबिरात मंजूर केला.  

आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली. शिबिरात पक्षवाढीच्या अनुषंगाने मंत्री आठवले यांनी आरपीआयच्या राज्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहे. तसेच, महायुतीमधून पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आरपीआय पक्षाला महामंडळ आणि मंत्रिपदे मिळतील, असा ठरावही घेण्यात आला. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत आणि मनोज जरागेंच्या आंदोलनाबाबत या विचारमंथन शिबिरात ठराव मंजूर झाला असल्याचे मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे हे आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, अशी आमची भूमिका आहे. मनोज जरांगे यांनी एखादी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत घ्यावी, आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका टाळावी, असा सल्लाही जरांगे पाटील यांना आठवलेंकडून देण्यात आला आहे. 

ठाकरे बंधूंच्या युतीचा फुसका बार 

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. याउलट त्यांच्या एकत्र येण्याने आम्हाला फायदाच होणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आले आहेत. या मराठी मतांमध्ये सुद्धा 20 ते 22 टक्के मतं आमच्या बाजूने आहेत. हे दोघे एकत्र येणे म्हणजे दोघांचा फुसका बार असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली. तसेच, यापुढील निवडणुकीत ते दोघे हारणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला.

हेही वाचा

गणरायाचे आगमन, मुंबईसह मराठवाड्यात पुन्हा जोर’धार’; नांदेड, लातूरमध्ये पाणीच पाणी, गावांचा संपर्क तुटला

आणखी वाचा



Source link