
Wedding Guests Fight Viral Video: लग्न संभारात किरकोळ कारणांवरून वधू- वराकडील वऱ्हाडी एकमेकांशी भिडल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. अशा भांडणांमुळे अनेक संसार सुरु होण्यापूर्वीच मोडले गेले आहेत. सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओत वधू-वराकडील वऱ्हाडी एकमेकांसोबत हाणामारी करताना दिसत आहे. पनीरच्या भाजीत पनीर नव्हते म्हणून हा वाद पेटल्याचे सांगितले जात आहे. या भांडणाचा व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.







