
BJP MP Medha Kulkarni : पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर व फुलं ठेवण्यात आली होती. या घटनेची दखल भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली असून त्यांनी या भिंतीवर भगवा रंग आणि गणपतीचा फोटो आणि फुले वाहिली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यावरून नवा वाद सुरू झाला असून काहींनी खासदार कुलकर्णी यांच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्यांचे समर्थ देखील केले आहे. त्यांनी फेसबूकवर या बाबत पोस्ट देखील लिहिली आहे. महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार वाढले असल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊ या कृती करूया, असं आवाहन देखील मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.





