बाबो! वीज बिल न भरणाऱ्यांच्या घरांना आग लावा; अधीक्षक अभियंत्याकडून कर्मचाऱ्यांना सूचना

0
1
बाबो! वीज बिल न भरणाऱ्यांच्या घरांना आग लावा; अधीक्षक अभियंत्याकडून कर्मचाऱ्यांना सूचना


यूपीच्या वीज विभागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीज विभागाच्या बैठकीत वीज वितरण विभाग दोनचे अधीक्षक अभियंता धीरजकुमार जयस्वाल यांनी वीज थकबाकी न भरणाऱ्यांच्या घरांना आग लावण्याच्या खुल्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. अधीक्षक अभियंत्याचे निर्देश ऐकून वीज अधिकारी व कर्मचारीही हैराण झाले. या सभेचा व्हर्च्युअल व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली. बुधवारी हा व्हिडिओ एमडी ईशा दुहान यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तात्काळ कारवाई करत अधीक्षक अभियंत्याला निलंबित केले. त्यांना मुख्य अभियंता वितरण मुरादाबाद यांच्या कार्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे. ईशा दुहान म्हणाल्या की, वीज ग्राहकांबद्दल अश्लिल आणि अपशब्द वापरणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला सोडले जाणार नाही.



Source link