
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq abdullah) कटरा येथे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भजनेही गायली. माता वैष्णोदेवी यात्रेच्या बेस कॅम्पवर हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला ‘तूने मुझे बुलाया शेरावालिये’ या प्रसिद्ध भजनातील ओळ गाताना ऐकू व पाहू शकता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.