
छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील एका पॉश भागात एका मुलीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून खूपच खराब स्थितीत आहे. मृतदेह सापडल्याचे वृत्त समजताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. कुत्रा मुलीची कवटी घेऊन फिरताना दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना राजेंद्र नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे.