Satara News : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मतदार याद्यांमध्ये केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे देशात मोठं वादळ निर्माण झालं आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर देशात ठिकठिकाणी मतदार यादींमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप आणि दावे केले जात आहे. अशातच कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहायक गजानन आवळकर आणि त्यांच्या परिवाराचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याचा आरोप भाजपचे (Satara News) आमदार अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी विधानसभेची यादी देखील पुरावा म्हणून दिली आहे.
2024च्या विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी मतदान, गुन्हा दाखल करण्याची मागणी
दरम्यान, 2024च्या विधानसभा निवडणुकीत आवळकर कुटुंबीयांनी कराड शहर आणि वाठार येथे दोन ठिकाणी हे मतदान केल्याचा आरोप करत भाजप प्रवक्ते मोहन जाधव यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. एकीकडे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचा विषय लावून धरलेला असताना राज्यातील काँग्रेसचे बडे नेते असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकाकडून हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा आवळकर यांना पाठिंबा असल्याचाही आरोप विरोधकांनी केला असून, विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बोगस मतदान पडताळणी समितीचे अध्यक्ष आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा