Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रसमाजपरोपकारी कार्याचा गौरव करत सरन्यायाधीश भूषण गवई यांची समाधीस्थळाला भेट

समाजपरोपकारी कार्याचा गौरव करत सरन्यायाधीश भूषण गवई यांची समाधीस्थळाला भेट

कोल्हापूर : सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेचा दीपस्तंभ ठरलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अभिवादन केले. त्यांनी कोल्हापूर येथील शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन पुष्प अर्पण केले आणि त्यांच्या अद्वितीय योगदानाला नतमस्तक होत आदरांजली वाहिली.

यावेळी शाहू छत्रपती, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता तसेच न्यायालयीन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

शाहू महाराजांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करून सामाजिक प्रबोधन घडवले. त्यांच्या ‘समान न्याय’ या तत्त्वाने न्यायव्यवस्थेला समावेशक व मानवीय रूप दिले. हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक समाजसुधारकांना प्रेरणादायी ठरले आहे.

दरम्यान, आज दि. १७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments