
पुण्यात ऐन दिवाळीत हिट अँड रनची घटना समोर आली आहे.दिवाळीमध्ये रस्त्यावर दिवाळीचे फटाके उडवताना भरधाव कारने तरुणाला उडवले. पिंपरी चिंचवडमध्ये हा अपघात झाला. रावेत परिसरात रस्त्यावर फटाके उडवणाऱ्या एका ३५ वर्षांच्या तरुणाला भरधाव कारने उडवले यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये हा भयावह अपघात कैद झाला आहे.







