Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशपहिल्या प्रियकराच्या मदतीने केली होती पतीची हत्या, नंतर दुसऱ्या BFने तिलाच...

पहिल्या प्रियकराच्या मदतीने केली होती पतीची हत्या, नंतर दुसऱ्या BFने तिलाच…

पहिल्या प्रियकराच्या मदतीने केली होती पतीची हत्या, नंतर दुसऱ्या BFने तिलाच…

[ad_1]

Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये 11 मार्च रोजी पोलिसांना महिलेचा मृतदेह सापडला होता. रॉबर्ट्सगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर ममता श्रीवास्तव अशी तिची ओळख पटली. तसंच, महिला विंडमगंज परिसरातील रहिवाशी असल्याचेही पोलिसांना कळले. त्यादृष्टीने त्यांनी तपासाची दिशा ठरवली. (Love Affair News In Marathi)

हत्येच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृतदेहाची तपासणी केल्यानंतर महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. महिलेच्या जवळच्या व्यक्तीनेच ही हत्या घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. त्यादिशेनेच त्यांनी तपास सुरू केला होता. 

महिलेचा दुसरा प्रियकर

पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा त्याचे धागेदोरे महिलेचा प्रियकर नंदू यादव याच्यापर्यंत पोहोचले. तोदेखील विंडमगंज परिसरातील रहिवाशी होती. चौकशीत समोर आले की, महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. ती त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. मात्र, नंदू आधीपासूनच विवाहित होता. तो तिच्यासोबत लग्न करण्यास तयार नव्हता. 

ओढणीने गळा दाबून हत्या 

ममताचा त्याच्यावरील लग्नासाठीचा दबाव वाढत असताना चिडलेल्या नंदूने ममताचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने एकदिवस ममताला भेटण्यासाठी बोलवले व तिथे तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर ममताचा मृतदेह वार्ड नंबर एक जवळ फेकून दिला आणि तिथून फरार झाला. 

पहिल्या प्रियकराने केली होती ममताच्या पतीची हत्या 

पोलिस अधिकारी राहुल पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारी 2022मध्ये ममताने तिचा पहिला प्रियकर लवकुश श्रीवास्तव याच्या मदतीने पती राजीव श्रीवास्तव याची हत्या केली होती. या हत्ये प्रकरणात तिचा पहिल्या प्रेमीला अटक करण्यात आले असून तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. 

म्हणून ममताला ठार केले

नंदू यादव तिचा दुसरा प्रेमी आहे. ममता त्यांच्याकडे असलेल्या पैशांना भुलून त्याच्याशी लग्न करण्यासाठी मागे लागली होती. मात्र नंदू या नात्यासाठी तयार नव्हता. त्यामुळंच त्याने तिची हत्या करण्याचा कट रचला. मात्र, पोलिसांनी या हत्येचा छडा लावत नंदूला ताब्यात घेतलं आहे. मात्र  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments