पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, पतीने मुलांवर काढला राग; Suicide Note मध्ये लिहिलं…, मोबाईलमध्ये सापडला ‘तो’ व्हिडीओ

0
2
पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, पतीने मुलांवर काढला राग; Suicide Note मध्ये लिहिलं…, मोबाईलमध्ये सापडला ‘तो’ व्हिडीओ


पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या निष्पाप मुलांनाही याची शिक्षा दिली. पतीने आपल्या 7 आणि 2 वर्षाच्या मुलांना विष पाजलं आणि नंतर आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 

अल्पेशभाई असं या व्यक्तीचं नाव असून तो सुरत शहरातील दिंडोली येथील एका शाळेत शिक्षक होता. तो ४१ वर्षांचा होता. त्याची पत्नी जिल्हा पंचायत कार्यालयात लिपिक आहे. “जेव्हा अल्पेशभाई कांतीभाई सोलंकी यांनी पत्नीचा फोन उचलला नाही, तेव्हा ती त्यांच्या घरी आली. यावेळी तिला दरवाजे बंद असल्याचं आढळले. त्यानंतर तिने तिच्या नातेवाईकांना फोन केला आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत गेल्यावर त्यांना बेडवर मुले आणि अल्पेशभाई मृतावस्थेत आढळले,” असं सूरतचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) विजय सिंग गुर्जर यांनी सांगितलं.

पोलिसांनी सांगितलं की त्यांना एक सुसाईड नोट, दोन डायरी आणि अल्पेशभाई सोलंकीच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ सापडले आहेत. अल्पेशभाईंच्या भावाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भावाची पत्नी फाल्गुनीभाई हिचे नरेश कुमार राठोड नावाच्या दुसऱ्या पुरूषाशी प्रेमसंबंध होते असा आरोप त्याने तक्रारीत केला आहे. 

“तो (अल्पेशभाई) पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे खूप तणावात होता आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या केली,” असं भावाने पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्या खोलीत अल्पेशभाई गेल्या 1-2 महिन्यांपासून तपशीलवार नोंदी करत होते त्या खोलीतून त्यांना एक डायरी सापडली आहे. 

“तपासासाठी दोन्ही डायरी जप्त करण्यात आल्या आहेत. ही सुसाईड नोट 5 ते 6 पानांची आहे. ती पालकांना आणि त्याच्या पत्नीला उद्देशून लिहिली आहे. त्याचा सारांश असा आहे की या प्रकरणामुळे तो तणावात होता,” असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. “दोन्ही डायरींपैकी फक्त एकच डायरी त्याच्या पत्नीसाठी लिहिलेली आहे. त्यात सर्व तपशील नमूद केले आहेत,” असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांच्यात नेहमी भांडण होत होतं असाही खुलासा अधिकाऱ्याने केला आहे. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून, पुढील तपास केला जात आहे. 





Source link