Monday, August 24, 2026
Homeदेश-विदेशपतीला आला पत्नीच्या अफेअरचा संशय, एकापाठोपाठ एक समोर आले 3-3 बॉयफ्रेंड; मग,...

पतीला आला पत्नीच्या अफेअरचा संशय, एकापाठोपाठ एक समोर आले 3-3 बॉयफ्रेंड; मग, जे घडलं…

पतीला आला पत्नीच्या अफेअरचा संशय, एकापाठोपाठ एक समोर आले 3-3 बॉयफ्रेंड; मग, जे घडलं…

[ad_1]

Crime News In Marathi: पती-पत्नीच्या नाते हे खूप नाजूक असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नी यांच्यातील वाद आणि त्या वादातून घडणाऱ्या गुन्हांचे प्रमाण वाढले आहे. अनैतिक संबंधातून पत्नीची किंवा पतीची हत्या करण्यात आल्याच्या घटना अलीकडेच खूप घडत आहेत. असाच एक प्रकार आग्रा येथे घडला आहे. पतीला पत्नीचे बाहेर अफेअर असल्याचा संशय आला. त्यानंतर जे काही घडलं ते फार धक्कादायक होते. 

कासगंजच्या कस्बा गंजडुंडवारा येथील एका युवकाची गुजरातच्या बडोदा येथे धारदार चाकूने वार करत हत्या केली आहे. गुजरात पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवकाच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत हत्येचा कट रचला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

युवक हा गुजरात येथे त्याच्या पत्नीसोबत राहत होता. तिथेच त्याच्या पत्नीचे तीन जणांसोबत सूत जुळले. एकाचवेळी तिघांसोबत तिने प्रेमप्रकरण सुरू होते. तिच्या पतीला याबाबत कळले. त्यानंतर पत्नीने तिच्या तिन्ही प्रियकरांसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नजिम असं हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तो बडोदरा येथे फळ विकण्याचे काम करतो. बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तो फळबाजारात जात होता. त्याचवेळी त्याची पत्नी रहमतने तिच्या तीन प्रियकरांना नजिम घराबाहेर पडत असल्याची माहिती पुरवली. त्यानुसार, तिघांनीही ठरलेल्या प्लाननुसार नजिनवर चाकूने वार केले. या हल्ल्यात नजिमचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 

पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला आहे. चौकशीत समोर आलेल्या पुराव्यानुसार, पोलिसांनी पत्नी आणि तिच्या तीन प्रियकरांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे, नजिम आणि रहमतला दोन मुलं आहेत. एक 4 वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांची मुलगी आहे. 

पतीने केले तीन लग्न

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयाच्या संचालकाने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न केले. मात्र, दुसरं लग्न झाल्यानंतरही त्याने पत्नीला मारहाण केली तसंच, अनैसर्गिक लैंगिक अत्याचारही केले. तसंच, जबरदस्ती गर्भपातही घडवून आणला. तसंच, जेव्हा दुसऱ्या पत्नीने त्याचा विरोध केला तेव्हा त्याने तिला घराबाहेर काढले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून तिसरे लग्न केले. या प्रकरणी दुसऱ्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments