Fussclass Dabhade Teaser : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सतत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. त्यामध्ये दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती असल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या चित्रपटांची खासियत म्हणजे ते वास्तववादी असल्याने प्रेक्षक त्याच्याशी एकरूप होतात. आता ‘झिंम्मा’ सिनेमाच्या यशानंतर हेमंत ढोमेचा ‘फसक्लास दाभाडे!’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून सर्वजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.