Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशदिल्ली मेट्रोमध्ये 'दंगल'..! महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल

दिल्ली मेट्रोमध्ये ‘दंगल’..! महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल

दिल्ली मेट्रोमध्ये ‘दंगल’..! महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल

[ad_1]

Women Fight Viral Video : सार्वजानिक ठिकाणी होणाऱ्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल. कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी मेट्रोमध्ये, अनेकदा कशाचीही पर्वा न करता लोकं बिनधास्त भांडताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोमध्ये (Women Fight In Delhi Metro) महिला एकमेकींच्या झिंज्या उपटताना आणि कानाखाली मारताना दिसत आहेत. यामध्ये आता मेट्रोची प्रतिमाही मलीन झाल्याचं पहायला मिळतंय.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसतंय की, एका मेट्रोच्या बोगीमध्ये खूपच गर्दी झाली होती. त्यावेळी काही कारणास्तव दोन महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. दोन्ही महिलांमधील वाद वाढत गेला अन् प्रकरण तापलं. यानंतर एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या कानाखाली मारली. त्याचवेळी जवळ उपस्थित असलेल्या महिलांनी दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश मिळत नाही. उपस्थितांनी हा व्हिडीओ (Women Fight Viral Video) सोशल मीडियावर शेअर केलाय.  

महिलेच्या काही मैत्रिणी देखील मेट्रोमध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी देखील हात साफ करून घेतल्याचं पहायला मिळतंय. मात्र, बाकीच्या महिलांनी वाद शमवल्याचा प्रयत्न केला अन् काही वेळाने दोन्ही महिला वेगवेगळ्या स्टेशनवर उतरल्या. मात्र, ज्यावेळी भांडण सुरू होतं, तेव्हा मेट्रोमधील प्रकरण चांगलंच तापलं होतं.ॉ

पाहा Video

दरम्यान, या घटनेवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया आहे. पूर्ण विश्वातील सर्वाधिक घटना दिल्ली मेट्रोमध्ये घडतात, असं एकाने म्हटलंय तर दिल्ली मेट्रोमध्ये जितके नाटक बिग बॉसमध्ये आहे तितके नाटक नाही. आता बिग बॉसपेक्षा दिल्ली मेट्रोमध्ये जास्त नाटक आहे, असं दुसऱ्याने म्हटलंय. त्याचबरोबर दिल्ली मेट्रो आणि मुंबई लोकल फाईट क्लब वाहतूक मानली पाहिजे, असंही काहींनी म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments