Friday, August 21, 2026
Homeमनोरंजनदक्षिण सोलापुरात स्वयंपाक गॅस टाकीचा स्फोटात शेतघर भस्मसात

दक्षिण सोलापुरात स्वयंपाक गॅस टाकीचा स्फोटात शेतघर भस्मसात

दक्षिण सोलापुरात स्वयंपाक गॅस टाकीचा स्फोटात शेतघर भस्मसात

[ad_1]

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात एका शेतघरात स्वयंपाक गॅस टाकीचा स्फोट होऊन त्यात पाच लाख ३० हजारांची रोकड आणि १३ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ३० पोती धान्य आदींचे नुकसान झाले.‌ या आगीत एका गाईच्या वासराचा होरपळून मृत्यू झाला. सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.‌

विंचूर गावात शेतवस्तीवर राहणा-या शिवप्पा लगमनण्णा फुलारी यांच्या शेतघरात दुपारी अचानकपणे स्वयंपाक गॅस टाकीचा स्फोट झाला. त्यावेळी फुलारी यांची तीन मुले दुसऱ्याच्या शेतात (द्राक्ष बाग) कामाला गेली होती. तर पत्र्याचे शेड प्रखर उन्हात जास्तच तापू लागल्याने शिल्पा फुलारी हे पत्नी व नातवंडांसह घरासमोरील एका झाडाखाली बसले होते. तेव्हा एका पत्राच्या शेडमध्ये स्वयंपाक गॅस टाकीचा स्फोट झाला. त्यानंतर वस्तीला आग लागली. स्फोटाच्या आवाजामुळे आसपासच्या शेतकऱ्यांनी फुलारी वस्तीवर धाव घेतली.

दुपारच्या रणरणत्या उन्हात लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न अपुरे पडले. तोपर्यंत शेतघरातील रोकड, सोन्याचे दागिने, धान्यसाठा, दुचाकी आदी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पत्र्याच्या शेडजवळ एका गाईच्या वासराला बांधले होते. ते वासरू आगीत मृत्युमुखी पडले. या आगीमुळे फुलारी कुटुंबातील १५ जणांचा संसार उघड्यावर पडला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी नुकसानग्रस्त शेतघराचा पंचनामा करण्याचा आदेश दिला.‌ त्यानुसार मंडळ अधिकारी व तराठ्यांनी फुलारी यांच्या जळीत शेतघराच्या नुकसानीचा पंचनामा केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments