Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रथर्टी फर्स्टसाठी पुण्यात ३ हजार पोलिस तैनात! बेशिस्त वाहन चालक, मद्यपी चालकांवर...

थर्टी फर्स्टसाठी पुण्यात ३ हजार पोलिस तैनात! बेशिस्त वाहन चालक, मद्यपी चालकांवर होणार कारवाई

[ad_1]

Pune 31st December Celebration: नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच लगबग सुरु असताना पुणेकर देखील नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र नव्या वर्षाचं स्वागत करताना कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही यासंदर्भातील काळजी घेण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी 31 डिसेंबरच्या सायंकाळपासून पुण्याच्या रस्त्यांवर ३ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने चालणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या विरोधात विशेष मोहीम राबवण्याची तयारी केली आहे. ३० तारखेच्या रात्रीपासूनच पुण्यात अनेक ठिकाणी थर्डी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी आणि तपासणी सुरू झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments