तेरावा झाल्यानंतरच राजकीय चर्चा, रोहित पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष अन् व्हायरल व्हिडिओबाबत मांडली भूमिका

0
15


अजित दादांची बातमी आपण ऐकली, बातमी खरी आहे का स्वप्न आहे हे आम्हालाही कळत नाही. आजपर्यंत आम्ही त्या दु:खात आहोत, त्या विमानात आणखी जे होते त्यांचाही परिवार दुःखात होता. काही दिवसांपूर्वी कळले की, दिंडोरी तालुक्यातील सुदाम बोडके हे अजित दादांचे आणि साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. जेव्हा त्यांना अजित दादांच्या निधनाची बातमी कळली, तेव्हा अस्वस्थ झाले नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. आज पवार परिवार आणि हा परिवार दुःखात आहे. त्यामुळे, मी बोडके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, 9 तारखेपर्यंत मी कुठलीही राजकीय चर्चा करणार नाही. अजित दादांच्या तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मी राजकीय विषयावर भाष्य करेन, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.  

तेरावा ज्या दिवशी होईल, त्या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन सांगेल, आता राजकीय बोलणे ते योग्य नाही. दादांसोबत काय चर्चा झाली, सगळ्या प्रक्रियेत मी होतो, मात्र तेरा दिवसांनी सांगेल, असे म्हणत रोहित पवारांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओ अजित दादांसोबत काय चर्चा झाली, याबाबतचे बोलणे सध्यातरी टाळले. तसचे, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यावरही रोहित पवारांनी परखडपणे भूमिका मांडली. 



Source link