
ठाण्यातील सिने-गॉग हे ज्यू धर्मियांचे धर्मस्थळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल ठाणे पोलिसांच्या ई-मेल आयडीवर प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये म्हटले आहे की, बॉम्ब धर्मस्थळाच्या आत ठेवला आहे. मेल प्राप्त होताच पोलीस सतर्क झाले असून शहरातील टेंभीनाका, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील सर्व रस्ते बंद केले आहेत. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळ परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





