Friday, September 11, 2026
Homeदेश-विदेशजीव धोक्यात घालून बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत घुसणाऱ्या ९०,००० भारतीयांना अटक

जीव धोक्यात घालून बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत घुसणाऱ्या ९०,००० भारतीयांना अटक

[ad_1]

जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसण्याचे प्रयत्न करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली असल्याचे अमेरिकेच्या कस्टम विभागाच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या विभागाने नुकतीच आकडेवारी जारी केली असून १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान अमेरिकेच्या सीमेच्या आत बेकायदेशीर मार्गाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तब्बल ९०,४१५ भारतीयांना अटक करण्यात आलेली आहे. यातील ५० टक्के भारतीय हे गुजरात राज्याचे निवासी असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. या कालावधीदरम्यान अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न करताना दर तासाला १० भारतीयांना अटक करण्यात आली असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यापैकी ४३,७६४ भारतीयांना अमेरिका-कॅनडा सीमेवर अटक करण्यात आली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments