चीनमध्ये JN1 व्हेरिएंटने हाहाकार; २४ तास जळत आहेत चिता, स्मशानभूमीसमोर लागल्या रांगा

0
18
चीनमध्ये JN1 व्हेरिएंटने हाहाकार; २४ तास जळत आहेत चिता, स्मशानभूमीसमोर लागल्या रांगा


कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन. १ जगभरात धुमाकूळ घालत आहे. विशेष करून  ब्रिटन,  चीन  आणि अमेरिकेत जेएन.१ च्या प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. सांगितले जात आहे की, कोरोनामुळे चीनमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृतांची संख्या इतकी आहे की, येथील शवदाहिन्या २४ तास सुरू आहेत. चीनच्या स्थानिक वृत्तपत्रात याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मृतांचा आकडा वाढल्याचे सांगण्यात येत आहे. डब्लूएचओने जेएन-१ ला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट संबोधले आहे.



Source link