
Gandhinagar fake court : गुजरातमधील गांधीनगर इथं एका भामट्यानं बोगस कोर्ट सुरू करून अनेक वर्षे ते चालवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कोर्टात आरोपी स्वत: न्यायाधीश झाला होता आणि बनावट वकीलही नेमले होते. इतकंच नाही, त्यानं या सगळ्याचा वापर करून काही प्रकरणांचे निकालही सुनावले. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.








