Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रगणेश विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू; धुळे जिल्ह्यातील गावात उत्सवावर...

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्यांचा मृत्यू; धुळे जिल्ह्यातील गावात उत्सवावर दु:खाचे सावट

[ad_1]

मुंबई, पुणे, कोल्हापूरसह संपूर्ण राज्यभरात आज आनंद उत्सवाची सांगता होत असून गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात व जल्लोषात सुरू आहेत. भाविक आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देत आहेत. शहरांसोबतच गावा गावात ट्रॅक्टर ट्रॉलीतून ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. या आनंदाच्या वातावरणातच धुळे जिल्ह्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे. धुळे शहराच्या जवळ असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वीच एका ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला आहे. येथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरजवळ या मुली खेळत असताना हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments