
Gatari 2025 : महाराष्ट्रात आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्याला अतिशय महत्त्व आहे. आषाढी अमावस्यानंतर सुरु होतो तो श्रावण महिना, जो धर्मात शुभ मानला जातो. श्रावणात एक महिना नॉनव्हेज आणि मद्यपान केलं जातं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात एक अजून परंपरा आहे, आषाढी अमावस्याला गटारी अमावस्या असं म्हटलं जातं. या गटारी अमावस्याला नॉनव्हेज प्रेमी मनसोक्त मासांहार आणि मद्यपान करतात. कारण पुढील महिनाभर त्यांना नॉनव्हेज खायला मिळणार नाही. यंदा आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या 24 जुलै 2025 ला साजरी करण्यात येणार आहे. दीप अमावस्या ही 24 जुलै म्हणजे गुरुवारी असणार आहे. गुरुवारी महाराष्ट्रीय लोक नॉनव्हेज खात नाहीत. त्यामुळे बुधवार 23 जुलै 2025 गटारी अमावस्या साजरी करण्यात येणार आहे. तुम्ही पण गटारी साजरी करण्याचा विचारात असाल तर एकदा दिवसात किती चिकन खाणं आरोग्यासाठी योग्य आहे जाणून घ्या.
आरोग्य तज्ञ्जानुसार एका सर्वसामान्य सृढय व्यक्तीला साधारण 25 ते 40 टक्के कॅलरी फॅटची गरज असते. जी व्यक्ती खूप मेहनत करतात, त्यांना जास्त कॅलरीची गरज असते. पण जे जास्त शारीरिक मेहनत घेत नाहीत, त्यांना जास्त कॅलरीची गरज नसते. दररोज भाजीपाला प्रथिनांच्या जागी मांस नियमितपणे खाल्ले जाऊ शकतं; ते फक्त तुम्ही ते कसे खाता यावर अवलंबून आहे. विशेषतः चिकन हे रोजच्या वापरासाठी विचारात घेण्यासारखे सर्वोत्तम मांस आहे. तुम्हाला फक्त काही प्रकारचे मांस टाळावे लागेल: क्रिमी चिकन डिशेस, मसालेदार जड पदार्थ, तळलेले पदार्थ इ. कमीत कमी मसाल्यांसह ग्रील्ड किंवा रोस्टेड चिकन खाण्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्याकडे एक चांगला दैनंदिन आहार असेल.
चिकनमध्ये भरपूर पौष्टिक मूल्ये असतात ज्यामुळे ते एक उल्लेखनीय डिश बनते. 100 ग्रॅम चिकनमध्ये 124 किलोकॅलरी, 3 ग्रॅम फॅट आणि 20 ग्रॅम प्रथिने असतात. तर चिकनमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, सोडियम आणि व्हिटॅमिन डी यासारखे काही चांगले जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. चिकन हे प्रथिनांच्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक आहे. हे महत्वाचे आहे कारण प्रथिने तुमच्या शरीराच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. ते पेशीय उत्पादन आणि पुनरुत्पादनासाठी जबाबदार आहे.
पण चिकन हा असा पदार्थ आहे जो तुम्ही दररोज खाऊ शकता आणि फक्त तो योग्य पद्धतीने शिजवून खाणे महत्त्वाचे आहे. जास्त शारीरिक श्रम न करणाऱ्या व्यक्ती जास्त दूध, दही, तूपाचे पदार्थ किंवा मासांहार करतात तेव्हा त्यांना स्थूलपणाला सामोरे जावे लागते. तसंच त्या व्यक्ती विविध आजारांना बळी पडतात. ज्या व्यक्तींना मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजेच मधुमेह, उच्च रक्तदाव, ट्रायग्लिसराइड, कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाचा आजार असेल त्यांना साधारण 10 ते 15 टक्के कॅलरी एवढेच सेवन योग्य कराल.
ओमेगा 3 सारखे काही गरजेचे फॅटी एसिड्स फॅट्स आहेत, जे केवळ अन्नातून मिळतात, ते आपल्या शरीरासाठी अनिवार्य आहेत. इतर फॅटी अॅसिडमुळे आपले शरीर कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन स्वत:निर्माण करते. तुम्ही सर्वसाधारण आयुष्य जगताय. म्हणजे अॅथलिट, बॉडीबिल्डर, वेटलिफ्टर, स्ट्रॉंगमॅन अशा व्यवसायात नसाल तर हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. कारण अशावेळी तुम्ही साधारण 30 ग्रॅम प्रोटीन शरिराला आवश्यक आहे.
आता चिकनच्या हिशोबात 30 ग्रॅम प्रोटीन पाहायला गेलं तर 100 ग्रॅम चिकनमध्ये 30 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे एकावेळेस तुम्ही 100 ग्रॅम चिकन खाऊ शकता. पण 100 ग्रॅम चिकनसोबत शरीराला उपयोगी असणारे कार्ब, विटामिन, फायबर असणाऱ्या पदार्थांचे सेवन करणेदेखील आवश्यक मानले गेले आहे.