
बीएमसीकडून ४ वैद्यकीय महाविद्यालये, १ दंत महाविद्यालय, १६ उपनगरीय रुग्णालये,५ विशेष रुग्णालये, ३० प्रसूतिगृहे, १९२ दवाखाने चालवले जातात. यासोबतच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” ची संख्या २०२ आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये ५० हजार पेक्षा अधिक रुग्ण दररोज बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच, वार्षिक सरासरी२० लाख पेक्षा अधिक रुग्ण आंतर रुग्ण सेवेचा लाभ घेतात. ‘झिरो प्रिस्क्रिपशन पॉलिसी’ चा या सर्वांना लाभ मिळणार आहे.







