
what is balochistan liberation army : पाकिस्तानातील अशांत बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानकावर शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटात २४ जण ठार तर ४६ जण जखमी झाले आहेत. प्रांतीय राजधानी क्वेटा येथील रेल्वे स्थानकावर पेशावरला जाणारी जाफर एक्स्प्रेस सुटण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर प्रवासी जमले असताना हा स्फोट झाला. बलोच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तान लष्कराने पाकिस्तानवर अशाप्रकारे हल्ला करण्याचे ही पहिलीच वेळ नाही. हा बंडखोर गट पाकिस्तानात अनेक वेळा हल्ले केले आहे. ही संघटना नेमकी काय आहे? त्यांच्या मागण्या काय आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं!