
Viral News : तुम्ही फसवणुकीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. पैसे न देण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल याचा काही नेम नाही. चीनमध्ये फसवणुकीची अशीच एक घटना उघडकीस आली असून फसवणूक करणाऱ्याने चक्क फसवणुकीसाठी कंडोम आणि मेलेल्या झुरळांचा वापर केला. या व्यक्तीने तब्बल ६३ हॉटेलला या माध्यमातून चुना लावला आहे. मोफत राहण्यासाठी त्याने ही शक्कल लढवल्याचे पुढे आले आहे. या व्यक्तीने ब्लॅकमेल करून नुकसान भरपाईची रक्कम देखील लुबाडली आहे. फसवणूक करणारा तरुण हा २१ वर्षीय असून त्याला एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार होता. त्यानंतर त्याला शिष्यवृत्ती देखील मिळणार होती. मात्र, तसे झाले नाही. त्याच्या जवळचे पैसे संपले. यामुळे त्याने फसवणुकीचा मार्ग अवलंबला.