फंडा असा आहे की, २०२६ हे वर्ष कामाच्या ठिकाणी अधिक आव्हानात्मक असणार आहे, कारण आपण एआयच्या जगात पाऊल ठेवत आहोत. जे लोक हे बदल स्वीकारतील, तेच पदोन्नतीच्या शर्यतीत पुढे राहतील.
केंद्रीय कामगार मंत्रालयाने गिग वर्कर्सच्या सुरक्षेला प्राधान्य देत “१० मिनिटांत डिलिव्हरी’ प्रथा रोखण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच २०२६ मध्ये कामाच्या ठिकाणी अनेक बदल पाहायला मिळू शकतात. हे वर्ष ऑटोमेशन, एआय एजंट्सचा व्यापक वापर आणि औद्योगिक विवादांनी प्रभावित असेल असे मानले जात आहे. हे बदल नेमके कसे असतील? तर याची पहिली चाचणी तुमच्या प्रामाणिकपणावर होणार आहे.
१. मी हे एका कंपनीच्या अंतर्गत परिपत्रकावरून स्पष्ट करतो. कंपनीच्या प्रमुखांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग दिवसातून किमान २० मिनिटे पाहावे अशी माझी इच्छा आहे. गरज पडल्यास एका व्यक्तीला २४x७ देखरेखीसाठी ठेवा.’ याचा अर्थ असा की, जेव्हा कुणी पाहत नसते तेव्हा तुम्ही काय करता? आपल्या मूळ मूल्यांशी बांधील राहणे आता अनिवार्य होईल.
२. एआय आता अर्धा कर्मचारी बनत आहे. व्यवसाय आता माणसांप्रमाणेच एआयला प्रशिक्षण देण्यास तयार आहेत. कंपन्या तयार सिस्टिम खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या गरजेनुसार ‘टेलर-मेड’ एआय सिस्टिम विकसित करण्यावर भर देत आहेत.
३. जर तुम्ही लीडर असाल, तर तुम्हाला चॅटजीपीटीपेक्षा चांगले व्हावे लागेल. एआयने कमालीची पारदर्शकता आणली आहे. उत्पादन विभागात काम करणाऱ्यांनाही आता ग्राहकांच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. ग्राहकांना चॅटजीपीटीपेक्षा अधिक अचूक आणि मानवी उत्तरे हवी आहेत.
४. आता सीव्हीच जुने झाले नाहीत, तर पदव्या आणि पदांचा प्रभावही कमी होत आहे. कंपन्यांना त्यांचे लीडर्स ‘इन्फ्लुएन्सर’ असावेत असे वाटते. जर तुम्ही तुमच्या व्यावसायिक कौशल्याने इतरांवर प्रभाव टाकू शकत नसाल, तर तुम्ही स्पर्धेबाहेर फेकले जाल.
५. नवीन कर्मचारी आता ‘टेस्टर इंटर्नशिप’ शोधत आहेत. पदवीधर विद्यार्थी प्रथम सहा आठवडे वेगवेगळ्या क्षेत्रांत इंटर्नशिप करून अनुभव घेतील आणि मगच करिअर ठरवतील. दुसरीकडे, नियोक्ता पूर्णवेळ नोकरीच्या खर्चाशिवाय सखोल तज्ज्ञता असलेल्या ‘कॉन्ट्रॅक्ट’ आधारित टॅलेंटच्या शोधात आहेत.
६. कंपन्या आता तुम्हाला नाही, तर तुमची वृत्ती (Attitude), चारित्र्य आणि कंपनीच्या संस्कृतीत मिसळण्याची तुमची क्षमता पाहून एखाद्याची नियुक्ती करत आहेत. कौशल्ये शिकवता येतात, पण स्वभाव नाही, हे आता कंपन्यांना उमजले आहे.
७. ‘ब्ल्यू कॉलर’ मुले पुन्हा जोमाने परतताना दिसत आहेत. कुशल कामगार आता कोडिंग इंजिनिअर्सपेक्षा जास्त कमावत आहेत आणि ते कर्जमुक्त आयुष्य जगत आहेत. गेल्या वर्षापर्यंत ज्या नोकऱ्या खालच्या दर्जाच्या मानल्या जात होत्या, त्या आता पहिली पसंती बनत आहेत.
८. कर्मचारी आता मीटिंगमध्ये केवळ स्वतःचे मत मांडणार नाहीत, तर ते त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे संदर्भ घेऊन येतील. बोर्डरूममध्ये आता व्यवसायाचा मूळ हेतू आणि मूल्यांवर आधारित चर्चांना अधिक महत्त्व दिले जाईल.
९. नियोक्ते अशा कर्मचाऱ्यांना अधिक पसंती देतील जे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आपले काम अधिक सुलभ आणि वेगवान करू शकतात.
१०. ‘ऑर्केस्ट्रेटर’: नियोक्ते अशा लीडर्सना पसंत करतील जे केवळ कामाच्या अंमलबजावणीपेक्षा समन्वयावर अधिक भर देतील. त्यांच्यासाठी ‘ऑर्केस्ट्रेटर’ हे नवीन जॉब टायटल असेल.
Source link







