Shah Rukh Khan Movie Story : बॉलिवूडकहा किंग म्हणजे अभिनेता शाहरुख खान याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुखचा प्रत्येक चित्रपट त्याची वेगळी शैली दाखवणार असतो. शाहरुखच्या अशाच चित्रपटांपैकी एक २००४मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्वदेस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. अवघ्या २५ कोटी रुपये खर्च करून बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ३३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. या चित्रपटाला आयएमडीबीवर ८.२ रेटिंग मिळाले आणि समीक्षकांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले.