
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटूंब रोजंदारीवर काम करते. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील असून कामानिमित्त ते येथे राहतात. पीडिताही बांधकाम मजूर म्हणून कामाला जाते. आरोपी सनी कांबळे या २० वर्षीय तरुणीची छेड काढून तिला वारंवार त्रास देत होता. याबाबत त्याला समजही देण्यात आली होती. ९ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या वेळी पीडिता कामावरून घरी जात असताना सनी कांबळेने तिला रस्त्यात अडवले व तिला निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्याने तिच्यावर बलात्कार केला व गळा आवळून तिची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला.






